शास्त्रज्ञांनी तयार केले फुफ्फुसाचे थ्रीडी मॉडेल, भारतीय विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांचा प्रयोग, क्षयरोगाच्या औषधांचे अचूक परीक्षण शक्य

---Advertisement---

 

बंगळुरू : क्षयरोग हा एक गंभीर आजार आहे. दरवर्षी लाखो लोक या आजाराने बाधित होतात. भारतीय शास्त्रज्ञांनी यात क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. बंगळुरू येथील भारतीय विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत फुफ्फुसांचे थ्रीडी मॉडेल तयार केले आहे. यामुळे क्षयरोगांच्या औषधांचे परीक्षण आता अधिक अचूक आणि वेगाने करणे शक्य होणार आहे.

आतापर्यंत प्रयोग शाळेत क्षयरोगाच्या औषधांची चाचणी प्लॅस्टिकच्या सपाट प्लेटवर केली जात होती. मानवी फफ्फुसे ही सपाट नाहीत यासाठी शास्त्रज्ञांनी त्रिमितीय म्हणजेच थ्रीडी मॉडेल तयार केले आहे. शास्त्रज्ञांनी कोलेजन जेलच्या मदतीने तयार केलेली ही थ्रीडी रचना हुबेहुब मानवी फुफ्फुसांच्या उतींप्रमाणे कार्य करते. या मॉडेलमध्ये क्षयरोगाचे जीवाणू एखाद्या रुग्णाच्या शरीरात वाढत असल्याप्रमाणे वाढतात. भारतीय विज्ञान संस्थेचे डॉ. रचित अग्रवाल आणि त्यांच्या टीमने केलेल्या या संशोधनानुसार, जुन्या टूडी मॉडेल्समुळे अनेकदा औषधांच्या परिणामांची अचूक माहिती मिळत नव्हती.

क्षयरोगावरील महत्त्वाचे औषध ‘पायराजीनामाइड’ जुन्या मॉडेल्समध्ये निष्प्रभ वाटायचे. मात्र, या नवीन थ्रीडी मॉडेलमध्ये या औषधाने अगदी रुग्णाच्या शरीरात दाखवतो तसाच सकारात्मक परिणाम दाखवला आहे. या नवीन थ्रीडी मॉडेलमुळे आता कोणतीही नवीन औषधे बाजारात आणण्यापूर्वी त्यांची विश्वासार्हता अधिक चांगल्या प्रकारे तपासता येईल.

  • क्षयरोग हा एक संसर्गजन्य आजार असून, तो ‘मायकोबॅक्टेरियम ट्युबरकुलोसिस’ नावाच्या जीवाणूमुळे होतो. हा आजार प्रामुख्याने फुफ्फुसांवर हल्ला करतो आणि हवेद्वारे एकाकडून दुसऱ्याला होतो. फुफ्फुसांव्यतिरिक्त हा जीवाणू मणका, मेंदू आणि मूत्रपिंडावरही परिणाम करू शकतो. भारतीय शास्त्रज्ञांच्या या यशामुळे भविष्यात क्षयरोगमुक्त भारताचे स्वप्न पूर्ण होण्यास मोठी मदत होणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---