---Advertisement---
देशासह राज्यात अनेक भागात जादू टोण्याच्या घटना घटना आहेत, अलीकडेच काळया जादूची पुन्हा एक घटना उघडकीस आली आहे. एका अज्ञात महिलेने हॉटेल समोर उघडपणे कथित स्वरूपाची काळी जादू केल्याने गाव हादरलं आहे. या घटनेचा संपूर्ण क्रम हा सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. यात सीसीटीव्ही फुटेज मध्ये चेहरा झाकलेली एक अज्ञात महिला देखील कैद झाली आहे.
हा संपूर्ण प्रकार आहे जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील जावखेडा ठोंबरे गावातील. जावखेडा ठोंबरे गावातील हॉटेल शिवनेरीच्या समोर हे काळी जादू केल्याचं उघडकीस आलं आहे. हॉटेल शिवनेरीच्या समोर हळद-कुंकू, लिंबू, बाहुली तसेच अन्य संशयास्पद साहित्य हे आढळून आलं आहे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांची तसंच काही पोलीस कर्मचाऱ्यांची नाव असलेल्या अनेक चिठ्ठ्याही त्या ठिकाणी सापडल्या आहेत. त्यामुळे अशा पद्धतीने कथेत स्वरूपात केलेल्या या काळया जादूमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
हॉटेल शिवनेरी बाहेरील हा संपूर्ण प्रकार पाहता, हॉटेल शिवनेरीचे मालक कृष्णा भानुदास ठोंबरे हे नेहमीप्रमाणे 30 जानेवारी रोजी रात्री दहा वाजता हॉटेल बंद करून घरी गेले. मात्र त्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी सकाळी हॉटेलचे कर्मचारी हे कामावर आले असताना हॉटेलच्या मुख्य दरवाजासमोर हे जादूटोण्याचे दृश्य पाहून त्यांना धक्का बसला, हॉटेलच्या मुख्य दरवाजासमोर हळदीकुंकू, लिंबू, बाहुली आणि काही संशयास्पद साहित्य हे पडलेलं होतं यासह धक्कादायक बाब म्हणजे त्या ठिकाणी काही चिठ्ठ्या होत्या आणि त्यात गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे नाव होती आणि काही पोलीस कर्मचाऱ्यांची नावं त्या चिठ्ठ्यांमध्ये लिहिलेली आढळून आली.
हा संपूर्ण प्रकार संशयास्पद असल्याने हॉटेल शिवनेरीच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यात आली आणि त्या सीसीटीव्ही फुटेज मधून हे संपूर्ण सत्य समोर आलं. हॉटेल शिवनेरी येथील सीसीटीव्ही फुटेज मध्ये एक चेहरा झाकलेले अज्ञात महिला रिक्षातून हॉटेल बाहेर पोहोचली आणि संबंधित महिलेने हॉटेल शिवनेरी समोर हा संपूर्ण प्रकार ठेवत असताना ती कैद झाली. हा संपूर्ण प्रकार उघडकीस आल्यानंतर हॉटेल शिवनेरीचे मालक कृष्णा ठोंबरे यांनी तात्काळ भोकरदन पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आणि अज्ञात महिलेच्या विरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू असून आरोपी महिलेची ओळख पटवून तिचा शोध घेण्याचा पोलिसांकडून प्रयत्न सुरू आहे.









