प्रवाशांसाठी महत्वाची बातमी ! राज्यात एसटी सेवा ठप्प होण्याची शक्यता; प्रलंबित मागण्यांसाठी MSRTC कर्मचारी आक्रमक…!

---Advertisement---

 

राज्यातील एसटी प्रवाशांसाठी पुढील काही दिवस चिंतेचे ठरण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील (MSRTC) कर्मचाऱ्यांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आक्रमक पवित्रा घेतला असून, तीन दिवसांत ठोस निर्णय न झाल्यास राज्यभर एसटी सेवा ठप्प करण्याचा इशारा कामगार संघटनांनी दिला आहे.

राज्य सरकारकडून आश्वासन देऊनही एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाचा फरक अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गात तीव्र नाराजी पसरली आहे. अनेक वेळा निवेदने देऊनही प्रश्न मार्गी न लागल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय उरलेला नसल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
वादाची पार्श्वभूमी

ऑक्टोबर 2025 मध्ये झालेल्या बैठकीत एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनासाठी दरमहा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून हा निधी महामंडळाला मिळालेला नाही. काही काळ महामंडळाने स्वतःच्या तिजोरीतून हा फरक दिला, मात्र सध्याच्या आर्थिक परिस्थितीत ते शक्य नसल्याने अलीकडील पगार वाढीव फरकाशिवाय करण्यात आला आहे.

कामगार संघटनांनी सरकारला तीन दिवसांची अंतिम मुदत दिली असून, या कालावधीत थकीत रक्कम जमा न झाल्यास रीतसर नोटीस देऊन राज्यव्यापी आंदोलन छेडले जाईल, असा इशारा देण्यात आला आहे. एसटी महामंडळावर आधीच मोठ्या प्रमाणावर कर्ज असताना कर्मचाऱ्यांचे वेतन थकवणे अन्यायकारक असल्याचे संघटनांचे म्हणणे आहे.

कर्मचाऱ्यांच्या या इशाऱ्यामुळे येत्या काही दिवसांत एसटी सेवा विस्कळीत होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपला प्रवास निश्चित करताना पर्यायी व्यवस्थेचा विचार करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---