---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील तरुणांसाठी आनंदाची बातमी असून उद्यापासून जिल्ह्यात पोलीस भरती प्रक्रियेला अधिकृत सुरुवात होत आहे. एकूण 171 जागांसाठी 1200 हून अधिक उमेदवारांनी अर्ज दाखल केले असून, या भरती प्रक्रियेसाठी पोलीस प्रशासन पूर्णतः सज्ज झाले आहे.

या भरती प्रक्रियेत 118 पुरुष उमेदवारांसाठी तर 53 महिला उमेदवारांसाठी जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. उमेदवारांची निवड पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने व्हावी, यासाठी यंदा डिजिटल टेक्नॉलॉजीचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात येणार आहे.
पोलीस भरतीदरम्यान मानवी चुका टाळण्यासाठी संपूर्ण प्रक्रिया डिजिटल पद्धतीने राबवली जाणार असून, उमेदवारांची नोंद, चाचण्या आणि मोजमाप यामध्ये तंत्रज्ञानाचा आधार घेतला जाणार आहे. तसेच भरती प्रक्रियेचे मैदान सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कडक निगराणीत ठेवण्यात आले असून, प्रत्येक टप्प्यावर नजर ठेवली जाणार आहे.
---Advertisement---
उद्या सकाळी ५ वाजेपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात होणार असून, उमेदवारांनी वेळेत उपस्थित राहण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच प्रक्रियेत कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
जळगाव जिल्ह्यातील बेरोजगार तरुण-तरुणींसाठी ही भरती प्रक्रिया मोठी संधी मानली जात असून, पारदर्शक व तंत्रज्ञानाधारित भरतीमुळे उमेदवारांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.









