प्रवाशांसाठी आनंदाची बातमी; भुसावळ-जळगाव मार्गे धावणार ‘या’ ४ विशेष रेल्वे गाड्या….!

---Advertisement---

 

जळगाव आणि भुसावळ मार्गे मुंबई, पुणे तसेच नागपूरकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. वाढती गर्दी आणि तिकीटांचा ताण लक्षात घेत मध्य रेल्वेने विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांना जळगाव आणि भुसावळ स्थानकांवर थांबे देण्यात आल्याने उत्तर महाराष्ट्रातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

  • CSMT- नागपूर सुपरफास्ट विशेष ट्रेन
    मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नागपूर दरम्यान दोन सुपरफास्ट विशेष गाड्या धावणार आहेत.
    १. गाडी क्रमांक 02139 – 19 फेब्रुवारी रोजी पहाटे 12.20 वाजता CSMTहून सुटून दुपारी 3.30 वाजता नागपूरला पोहोचेल.
    २. गाडी क्रमांक 02140 – 17 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता नागपूरहून सुटून दुसऱ्या दिवशी दुपारी 1.30 वाजता CSMTला पोहोचेल.

या गाड्यांना अप आणि डाऊन मार्गावर दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला, बडनेरा, वर्धा आदी स्थानकांवर थांबे असतील.

  • एल.टी.टी – नागपूर विशेष सेवा
    लोकमान्य टिळक टर्मिनस ते नागपूर दरम्यान चार विशेष गाड्या चालवण्यात येणार आहेत.
    १. गाडी क्रमांक 01021 सुपरफास्ट विशेष – 14 व 21 फेब्रुवारी रोजी पहाटे 12.55 वाजता LTTहून सुटेल.
    २. गाडी क्रमांक 01022 विशेष – 14 व 21 फेब्रुवारी रोजी रात्री 8.00 वाजता नागपूरहून सुटेल.

या गाड्यांना अप आणि डाऊन मार्गावर ठाणे, कल्याण, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, अकोला, बडनेरा, धामणगाव, वर्धा येथे थांबे असतील. इगतपुरी येथे थांबा निवडक गाडीसाठीच राहणार आहे.पुणे–नागपूर विशेष गाड्या

  • पुणे आणि नागपूर दरम्यानही विशेष रेल्वेची सोय करण्यात आली आहे.
    १. गाडी क्रमांक 01467 सुपरफास्ट – 13 व 20 फेब्रुवारी रोजी दुपारी 3.50 वाजता पुण्याहून सुटेल.
    २. गाडी क्रमांक 01468 सुपरफास्ट – 14 व 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.00 वाजता नागपूरहून सुटेल.
  • ३. गाडी क्रमांक 01419/01420 या अतिरिक्त गाड्या 18 व 19 फेब्रुवारी रोजी धावणार आहेत.

या गाड्यांना अप आणि डाऊन मार्गावर उरुळी, दौंड, अहिल्यानगर, मनमाड, जळगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, बडनेरा, वर्धा येथे थांबे असतील.

या सर्व विशेष गाड्यांमध्ये एसी, स्लीपर आणि जनरल डब्यांची सुविधा उपलब्ध असून तिकीट बुकिंग IRCTC वेबसाइट व अधिकृत रेल्वे काउंटरवर सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---