पिंपळगाव हरेश्वर हद्दीत अवैध धंदे थांबता थांबेना; अवैध धंदे चालकांचे पोलिसांसमोर मोठे आव्हान…!

---Advertisement---

 

पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे चालू असून पोलिस थातुर-मातुर कार्यवाही करून, कार्यवाही केल्याचा बनाव करत असल्याची चर्चा परिसरात होत आहे, पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन हद्दीत पत्त्यांचे क्लब, सट्टा,मटका,गावठी. दारू,या मुळे परिसरात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे चालू असतांनाचे चित्र दिसून येत आहे. दारूमुळे व्यसनाधिनता वाढून तरुण मुले व्यसनाच्या आहारी जात असल्याचे चित्र दिसून येत आहे, काही दिवसांपूर्वी पाचोरा तालुक्यातील लोहारा येथे मद्यधुंद युवकाने भर रस्त्यावर विवस्त्र होऊन बस स्टँड परिसरात धिंगाणा घातल्याचे चित्र समोर आले आहे.

सदरील मद्यपी रस्त्यावर फिरत असल्याने महिला व शाळकरी मुलींना लोहारा बस स्टँड परिसरात सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे,पिंपळगाव (हरेश्वर) पोलीस स्टेशन च्या सहायक पोलिस निरीक्षक कल्याणी वर्मा ह्या या अवैध विरोधात कारवाई करत आहेत मात्र अवैध धंदे या हद्दीत थांबता थांबत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अवैध धंदे चालू च असल्याने नेमक पाणी मुरतंय कुठ अशा दबक्या आवाजात चर्चा सुरू असून,या अवैध धंदे चालकांना नेमका आशिर्वाद कुणाचा असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी सदरील प्रकाराकडे लक्ष वेधून ठोस कार्यवाही करून अवैध धंदे कायमचे बंद करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---