उपमुख्यमंत्री अजित पवार ज्या विमानातून बारामतीत आले त्याच विमानातून मुख्यमंत्री फडणवीसांचा प्रवास ?

---Advertisement---

 

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या विमानातून प्रवास करून बारामतीत आले होते त्याच कंपनीच्या विमानातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे 26 ऑक्टोबर रोजी बारामती मध्ये दाखल झाल्याचं समोर आलं आहे. एकंदरीत मुख्यमंत्र्यांनी देखील त्याच कंपनीच्या विमानातून प्रवास केल्याचं उघडकीस आलं आहे.

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे ज्या विमानातून प्रवास करून बारामतीत आले होते त्याच कंपनीच्या विमानातून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील गेल्या 26 ऑक्टोबर रोजी बारामतीत त्याच विमानाने प्रवास करून दाखल झाले होते आणि नुकतच अजित पवार यांचं बारामतीत विमान अपघातात 28 जानेवारीला निधन झालं या घटनेनंतर त्या विमान कंपनीवर अनेक सवाल हे उपस्थित केले जात आहे. आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेत व्ही एस आर कंपनीवर मोठे गंभीर आरोप केले आणि आता तीन महिन्यांपूर्वीचा एक व्हिडिओ हा समोर आला आहे ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हीएसआर कंपनीच्या त्याच विमानातून प्रवास केला होता. देवेंद्र फडणवीस हे फलटणचे माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या एका कार्यक्रमासाठी त्याच कंपनीच्या विमानातून कार्यक्रमात गेले होते आणि कार्यक्रम संपल्यानंतर मुंबईकडे त्यांनी याच विमानातून प्रस्थान केलं होतं.

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या विमानाच्या प्रवासादरम्यान दुर्दैवी निधन झालं आणि त्यांच्या या अपघातानंतर व्ही एस आर कंपनी बाबत अनेक प्रश्न हे सर्वांकडून उपस्थित केले जात आहेत आणि आता पुन्हा एकदा ही कंपनी चर्चेत आली असून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कंपनीच्या विमानात प्रवास समोर आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---