मशिदीत पाय पसरून बसल्याच्या कारणावरून पाच जणांकडून एकास बेदम मारहाण; शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

---Advertisement---

 

मशिदीत पाय पसरून बसल्याचा राग मनात धरून एका व्यक्तीला पाच जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची घटना शहादा येथील कुकडेल भागात घडली आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी शफीक मेहमूद अन्सारी (वय ४२, रा. कुकडेल, शहादा) हे दि. १४ मार्च रोजी सायंकाळी ५:४५ च्या सुमारास कुकडेल जामा मशिदीत बसलेले होते. यावेळी ते पाय पसरून बसले होते, याचा राग आल्याने आरोपींनी त्यांना गाठले. आरोपी इकबाल अफान अन्सारी याने फिर्यादीची गचांडी धरून त्यांना अश्लील शिवीगाळ केली आणि मशिदीबाहेर ओढून नेले.

त्यानंतर आरोपी आवेश इकबाल अन्सारी आणि अज्जु इकबाल अन्सारी यांनी हातातील लाकडी काठीने फिर्यादीच्या पाठीवर, मानेवर आणि उजव्या पायावर जबर मारहाण केली. तसेच अख्तर इकबाल अन्सारी आणि मोहसिन आफान अन्सारी यांनी फिर्यादीला लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या प्रकरणी शफीक अन्सारी यांच्या फिर्यादीवरून शहादा पोलिसांनी आरोपी १) इकबाल अफान अन्सारी, २) आवेश इकबाल अन्सारी, ३) अज्जु इकबाल अन्सारी, ४) अख्तर इकबाल अन्सारी आणि ५) मोहसिन आफान अन्सारी (सर्व रा. कुकडेल, शहादा) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---