‘या’ योजनेत बायपाससह आता मोठ्या शस्त्रक्रिया फुकट होणार; आरोग्य मंत्र्यांची मोठी घोषणा….! जाणून घ्या कोणती आहे योजना?

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्यातील गरीब आणि गरजू रुग्णांसाठी मोठा दिलासा देणारी महत्त्वाची घोषणा सरकारकडून करण्यात आली आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजना आणि आयुष्यमान भारत या योजनेच्या अंतर्गत आता बायपाससह विविध मोठ्या शस्त्रक्रिया पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत दिली.

राज्य सरकारच्या या निर्णयामुळे रुग्णांना उपचारासाठी स्वतःच्या खिशातून एक रुपयाही खर्च करावा लागणार नाही. आर्थिक अडचणीमुळे अनेक रुग्णांची मोठी शस्त्रक्रिया लांबणीवर पडत असल्याच्या तक्रारी समोर येत होत्या. आणि त्यामुळे काही रुग्णांना अधिक त्रास सहन करावा लागत होता आणि इतकंच नाही तर अनेक रुग्णांना जीव देखील गमवावा लागत होता. दरम्यान याच पार्श्वभूमीवर सरकारने या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

विधानसभेत या विषयावर चर्चा करताना आमदार बबनराव लोणीकर यांनी एका शेतकऱ्याचा मुद्दा उपस्थित केला. संबंधित रुग्णाला बायपास शस्त्रक्रियेसाठी सुमारे ११ लाख रुपयांचा खर्च सांगण्यात आला होता. मात्र योजनेंतर्गत अपेक्षित मदत न मिळाल्याने शस्त्रक्रिया प्रलंबित राहिल्याचे त्यांनी निदर्शनास आणले.

यावर उत्तर देताना आरोग्यमंत्री आबिटकर यांनी स्पष्ट केले की, दोन्ही योजना एकत्रितपणे राबवण्यात येत असून उपचारासाठी मिळणाऱ्या मदतीची मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे बायपाससारख्या महागड्या शस्त्रक्रियांसाठी आता रुग्णांना पूर्ण आर्थिक संरक्षण दिले जाणार आहे. सरकारचा उद्देश स्पष्ट असून, आर्थिक अडचणीमुळे कोणाचाही उपचार थांबू नये, यावर भर दिला जात आहे.

यासोबतच, जर कोणतेही रुग्णालय या योजनेंतर्गत रुग्णांकडून अतिरिक्त पैसे मागत असेल, तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही आरोग्यमंत्र्यांनी दिला. संबंधित तक्रारी तात्काळ सरकारपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

या निर्णयामुळे हृदयविकारासारख्या गंभीर आजारांसाठी लाखो रुपये खर्च करण्याची भीती असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार असून, राज्यातील आरोग्य व्यवस्थेला देखील याचा सकारात्मक परिणाम होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---