३० वर्षे बंद असलेल्या वसंत साखर कारखान्यासाठी शेतकरी आक्रमक, ५५१ कोटींच्या थकहमीची मागणी

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यात वसंत सहकारी साखर कारखान्याजवळ शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कारखान्याच्या प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्याची मागणी करत शेतकरी आक्रमक झाले आहेत.

पुणे जिल्ह्यातील भोर येथे संग्राम थोपटे यांच्या साखर कारखान्याला ज्या प्रमाणे ५५१ कोटी रुपयांची थकहमी देण्यात आली, त्याच धर्तीवर वसंत सहकारी साखर कारखान्यालाही थकहमी मंजूर करावी, अशी मागणी आंदोलक शेतकरी करत आहेत.

सुमारे ३० वर्षांपासून हा कारखाना बंद अवस्थेत असून, अनेकदा पाठपुरावा करूनही शासनाकडून कोणतीही आर्थिक मदत मिळालेली नाही, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. कारखान्याशी संबंधित १४ हजारांहून अधिक शेतकरी सभासद असल्याने, हा उद्योग पुन्हा सुरू व्हावा आणि त्यांना दिलासा मिळावा, यासाठी थकहमी देणे आवश्यक असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

दरम्यान, शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही, तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही शेतकऱ्यांनी दिला आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा त्यांचा निर्धार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---