शहाद्यातील मोलगी परिसरात चाकूचा धाक दाखवून तरुणाची लूट, गुन्हा दाखल

---Advertisement---

 

शहादा तालुक्यातील मोलगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाला अडवून चाकूचा धाक दाखवत लुटल्याची घटना समोर आली आहे. मोलगी गावापासून काही अंतरावर हा प्रकार घडला असून, पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

१८ मार्च रोजी प्रविण रमेश सोळंके (वय २५, रा. ज्ञानेश्वर नगर, देवनांद्रा, ता. पाथरी, जि. परभणी) हे आपल्या सहकाऱ्यासह प्रवास करत होते. यावेळी अजय नावाच्या व्यक्तीसह काही जणांनी त्यांचे वाहन अडवले. त्यानंतर दोघांनाही जबरदस्तीने जवळच्या निर्जन टेकडीकडे नेण्यात आले.

तेथे आरोपींनी चाकू दाखवत जिवे मारण्याची धमकी दिली आणि त्यांच्या जवळील रोख रक्कम तसेच दोन महागडे मोबाईल (रेडमी १५ प्रो) हिसकावून घेतले. घटना घडल्यानंतर आरोपी तात्काळ पसार झाले.

फिर्यादीने दिलेल्या माहितीवरून आरोपींचे वय अंदाजे २५ ते ३० वर्षे असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०९(४) आणि ३५१(१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक जयसिंग पावरा करत असून, प्राथमिक चौकशीत हा प्रकार आर्थिक फायद्यासाठी केल्याचे निष्पन्न झाले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---