---Advertisement---
जळगाव : जीएसटीचे चलन भरण्यासाठी कंपनीकडून रक्कमेचा भरणा करण्यासाठी रक्कम घेतली. त्यातील काही रक्कम जीएसटी कार्यालयात वेळोवेळी भरणा केला. उर्वरित रक्कमबद्दल काही एक न सांगता स्वतःच्या फायद्यासाठी वापरली. ऑडीट रिपोर्ट चुकीचा करुन ५ लाख ६५ हजार ८९३ रुपयांची फसवणूक केली. बॅकृष्णा पावर फर्म या बॅटरी कंपनीच्या तक्रारीनुसार या प्रकरणी दोघांवर एमआयडीस पोलीस ठाण्यात पिता पुत्रावर गुन्हा दाखल करण्यात आला.
अमीत वासुदेव बुधानी रा. कृष्णा पावर (बॅटरी कंपनी) ई-८०-१ एमआयडीसी) यांच्या तक्रारीनुसार त्यांच्या कृष्णा पावर फर्मचे सन २०१९-२० ते सन २०२३-२४ पावेतो वेळोवेळी जीएसटी चलन भरण्यासाठी दोघांनी त्यांच्याकडून एकुण एक कोटी ६८ लाख ९७ हजार ८५५ रुपये घेतले. यापैकी ९७कोटी ६६ लाख ८७२ रुपये रक्कमेबद्दल न सांगता स्वतःच्या फायद्यासां वापरली. ही रक्कम तक्रारदार यांच्या व्यापाराच्या ऑडिट रिपोर्टमध्ये न दाखविता चुकीचा ऑडिट रिपोर्ट तयार केला.
हा प्रकार लक्षात आल्यानंतर ही बाब बुधानी यांनी दोघांच्या लक्षात आणुन दिली असता त्यांनी वेळोवेळी ६६ हजार ९९७ रुपये रक्कम परत केली. उर्वरित ५ लाख ६५ ह जार ८९३ रुपये आजपावेतो परत न करता टाळाटाळ केली. या प्रकरणी विवेक मधुकर पिंगळे, अक्षय विवेक पिंगळे (रा. गणेश प्लाझा, बळीराम पेठ हमु. मायादेवीनगर परिसर) यांच्या विरोधात बुधवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक बबन आव्हाड हे तपास करीत आहेत.









