अवैधपणे स्पिरीटची वाहतूक करणाऱ्यांवर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई तब्बल ८ लाख ६५ हजारांचा मुद्देमाल जप्त..!

---Advertisement---

 

स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की, शिरपूर जि. धुळे येथून कहटूळ मार्गे धडगावकडे एका पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनात दारु तयार करण्यासाठी लागणाऱ्या स्पिरीटची अवैध वाहतूक करणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी लागली पथकास कारवाई करणेकामी सूचना केल्या.

मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शहादा शहरातील मामाचे मोहिदा चौफुली परिसरात सापळा रचून संशयित पांढऱ्या रंगाच्या बोलेरो वाहनावर लक्ष ठेवले होते. संबंधित वाहन क्र. एम एच ०४ इ.एस. ९६५१ यास अडवून पथकाने तपासणी केली असता त्यामध्ये मोठया प्रमाणात स्पिरीटचा मुद्येमाल आढळून आला.

तपासणी दरम्यान वाहनातून भरलेले तब्बल ५५० लिटर स्पिरीट (दारु तयार करण्यासाठी वापरले जाणारे रसायन) जप्त करण्यात आले असून सदर वाहनातील इसम नामे वसंत कुसाल पावरा, वय-२६ वर्ष, रा.बिलगाव, पोस्ट चिखली, ता.धडगाव, जि. नंदुरबार यास ताब्यात घेण्यात आले असून, त्याचे सोबत एक इसम (पुर्ण माहिती उपलब्ध नाही) याने अंधाराचा फायदा घेत पळ काढला असून त्याचा शोध घेणे सुरु आहे.

सदर कारवाईत एकूण ०८,६५,०००/- रुपयांचा स्पिरीट व वाहन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपींविरुध्द शहादा पोलीस ठाणे येथे गु.र.न.३४२/२०२६ महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम ६५(अ) (ई), ८१,८३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास शहादा पोलीस स्टेशनमार्फत सुरु आहे.

सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक  श्रवण दत्त.एस, अप्पर पोलीस अधीक्षक  आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक  हेमंत पाटील, पोलीस उपनिरीक्षक  मुकेश पवार, विकास गुंजाळ, पोहेकॉ/पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, जितेंद्र पाडवी, पोना/विकास कापुरे, पोकॉ/शोएब शेख, भरत उगले, सतीष घुले अशांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---