सोनं दीड लाख पार! 24 तासांत मोठी उसळी; चांदीही अडीच लाखांच्या उंबरठ्यावर, जाणून घ्या आजचे दर काय

---Advertisement---

 

सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा एकदा मोठी उसळी पाहायला मिळाली आहे. गेल्या 24 तासांत सोन्याच्या भावात तब्बल 3 हजार 500 रुपयांची वाढ झाली असून चांदीच्या दरातही सुमारे 3 हजार रुपयांनी वाढ नोंदवण्यात आली आहे.या वाढीनंतर सोन्याचे दर आता दीड लाखांच्या उंबरठ्यावर पोहोचले आहेत.

आज जळगाव सुवर्णनगरीत सोन्याचा भाव 1 लाख 49 हजार 500 रुपये प्रति तोळा इतका नोंदवला गेला असून जीएसटीसह हा दर 1 लाख 53 हजार 985 रुपयांवर गेला आहे.दुसरीकडे, चांदीच्या दरातही मोठी वाढ झाली असून चांदीचा भाव 2 लाख 43 हजार रुपये प्रति किलोवर पोहोचला आहे. जीएसटीसह हा दर 2 लाख 50 हजार 290 रुपयांवर गेला आहे.

तज्ञांच्या मते, आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी, आर्थिक अनिश्चितता आणि गुंतवणूकदारांचा वाढता कल यामुळे सोन्या-चांदीच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. येत्या काळातही या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता तज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---