भोंदू खरातचा किळसवाणा कारनामा समोर! शाकाहारींना खाऊ घातला माशांचा प्रसाद; अशोक खरात कडून भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा….!

---Advertisement---

 

भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज नवे धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता श्रद्धेचा गैरफायदा घेत लोकांची फसवणूक केल्याचे गंभीर प्रकार उघड झाले आहेत. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, खरातने शाकाहारी नागरिकांना “मासा हा पाण्यातील वनस्पती आहे” असा खोटा दावा करत प्रसादाच्या नावाखाली मासे खाण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.

विशेषतः धार्मिक भावना आणि अंधविश्वासाचा आधार घेत काही नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळल्याचेही तपासात स्पष्ट होत आहे. “मासा कापल्यावर रक्त येत नाही, त्यात हाडे नसतात” अशा भ्रामक गोष्टी सांगून लोकांची दिशाभूल करण्यात आल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, या प्रकरणात विशेष तपास पथकाकडून सखोल चौकशी सुरू असून, आरोपीकडून वापरले जाणारे चार वेगवेगळे मोबाईल क्रमांक उघडकीस आले आहेत. हे क्रमांक वेगवेगळ्या कारणांसाठी व्हीआयपी संपर्क, महिलांशी संवाद, आर्थिक व्यवहार आणि सर्वसामान्य संपर्क यासाठी वापरले जात असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. या मोबाईलमधील डेटा फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आला असून, त्यातून आणखी धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.

न्यायालयाने अशोक खरातला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून, या प्रकरणात आणखी गुन्हे दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

या संपूर्ण प्रकरणामुळे समाजात संतापाची लाट उसळली असून, नागरिकांनी अशा भोंदूगिरीपासून सावध राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---