---Advertisement---
यावल तालुक्यातील चुंचाळे ते गायरान विद्युत उपकेंद्र दरम्यान टाकण्यात आलेल्या खांबावरील तसेच नायगाव पासून ते चुंचाळे दरम्यान टाकण्यात आलेल्या खांब्यावरील विद्युत तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केले आहे. मक्तेदाराकडून या ठिकाणी सबस्टेशनच्या काम केली जात होती. सब कॉन्ट्रॅक्टर यांनी या ठिकाणी खांबावर तारे टाकून सब स्टेशन पर्यंत वीजपुरवठा नेण्याचे काम करीत होते. दरम्यान खांबावर टाकलेले सदर तार चोरी झाले आहे. एका कॉन्टॅक्टरचे एक लाख वीस हजार तर एका कॉन्टॅक्टर चे एक लाख दहा हजार असे दोन लाख तीस हजाराचे तार चोरी झाले आहे. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान गेल्या वर्षभरापासून विद्युत तार चोरीचे प्रकार बंद झाले होते. मात्र पुन्हा सदर तार चोरी करणारे रॅकेट सक्रिय झाल्याचे आता दिसून आले आहे.
यावल तालुक्यातील चुंचाळे या गावात विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशनचे काम सुरू आहे. येथे सब कॉन्ट्रॅक्टर अतुल चौधरी रा. वड्री हे चुंचाळे ते गायरान दरम्यान गावठाण ११ केव्ही चे काम करत होते. विविध ठिकाणी त्यांनी खांब टाकले होते. आणि त्यावर तार लावण्यात आले होते. तेव्हा पाच गाल्यावरील त्यांचे हे तार कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले. एक लाख दहा हजार रुपये किमतीचे हे तार चोरी झाले आहेत. त्याचप्रमाणे याच सबस्टेशन अंतर्गत राहुल दिनकर चौधरी रा. साकळी हे देखील नायगाव ते चुंचाळे रस्त्यावर काम करत होते. त्यांचे देखील सात झाल्याचे तार चोरी झाले आहेत एकूण एक लाख वीस हजार रुपये किमतीचे तार अज्ञात चोरट्यांनी चोरी केले आहे. तेव्हा दोन्ही सब कॉन्ट्रॅक्टरांचे दोन लाख तीस हजाराचे विद्युत तार चोरी झाले आहे. तेव्हा याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.









