यावल शहरात फोटोग्राफरची कार अडवून केली मारहाण, साहित्य लांबवले; यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महामार्गावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय ते बुरूज चौक दरम्यान चारचाकी वाहन घेऊन जात असलेल्या फोटोग्राफरला शाईन दुचाकी घेऊन आलेल्या दोघांनी अडवले व वाद घातली तेव्हा तेथे अनोळखी २० लोकांचा जमाव जमला यात कारमधील २१ वर्षीय तरुणाला मारहाण करण्यात आली त्याचे फोटोग्राफीचे साहित्य तेथून लांबवण्यात आले तर कारच्या पुढील दरवाज्याला तोडून तसेच समोरील काच फोडण्यात आले आहे. तेव्हा या प्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यावल शहरातून मार्गस्थ होणाऱ्या अंकलेश्वर बऱ्हाणपूर राष्ट्रीय महा मार्गावर चोपडा कडे जाणाऱ्या रस्त्यावर एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय आहे. तेथून ते बुरूज चौका दरम्यान एचपी पेट्रोल पंपाच्या रोडवर अनिकेत नंदा जाधव वय २१ रा.मिलिंद नगर, जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा फोटोग्राफर चारचाकी वाहन क्रमांक एम.एच.०४ ई.एक्स. ०८११ व्दारे चोपड्याकडून यावल शहरात येत होता. दरम्यान रस्त्यावर शाईन काळ्या रंगाच्या लाल काळेपट्टे असलेल्या दुचाकीवरून दोन अनोळखी इसमांनी त्याला थांबवले आणि त्याच्याशी वाद घालायला सुरुवात केली. अचानक त्या ठिकाणी १५ ते २० जणांचा जमाव देखील चालून आला. यात त्याला शिवीगाळ करून मारहाण करण्यात आली. तसेच चारचाकी वाहनातील पुढील काच दगडाने फोडून, उजव्या दरवाज्याचे काच तोडून नुकसान करण्यात आले व फोटोग्राफीचे कॅमेरे व बॅग हे साहित्य देखील तेथून लांबवण्यात आले. तेव्हा याप्रकरणी अनिकेत जाधव यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---