---Advertisement---
एरंडोल परिसरामध्ये ट्रॅक्टर चोरी करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाला यश आले आहे. पथकाने कौशल्यपुर्वक तपास करत दोन संशयित आरोपींना जेरबंद केले असून, त्यांच्याकडून एरंडोल पोलीस स्टेशन येथे दाखल असलेल्या वेगवेगळ्या दोन गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले तब्बल 3,25,000/- रुपये एकूण किमतीचे दोन ट्रॅक्टर हस्तगत केले आहेत. ताब्यात घेतलेल्या संशयितांमध्ये एका विधीसंघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
एरंडोल पोलीस स्टेशन गु.रजि.क्र. 44/2026 व गुरजि.क्र. 84/2026 या लागोपाठ घडलेले ट्रॅक्टर चोरीचे गुन्हे दाखल झाल्याने घटनेचे गांर्भिय लक्षात घेता, पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याच्या सुचना दिल्याने. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड यांनी आपल्या अधिपत्याखालील अधिकारी व अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सदरचे गुन्हे तात्काळ उघडकीस आणणे बाबत आदेशीत केले.
त्याअनुषंगाने सदर पथकाने तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे विखरण (ता. एरंडोल) येथील आरोपी विकी देवरे व विधीसंघर्षग्रस्त बालक यांच्याकडे गुन्हा संदर्भात कौशल्यपुर्वक चौकशी केली असता, त्यांनी सदरचे दोन्ही गुन्हे हे त्यांचे साथीदार गणेश भिकन गोसावी व प्रविण भाईदास कोळी (दोन्ही रा. विखरण, ता. एरंडोल) यांचेसह केल्याची कबुली दिली.
सदर गुन्हयांत नमुद आरोपीतांना ताब्यात घेवुन त्यांचेकडुन एकुण 3,25,000/- रुपये किमतीचे दोन ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. तसेच इतर दोन आरोपीतांचा पोलीस पथकामार्फत कसुन शोध सुरु आहे.









