हतनूर धरणातील पाणी पाताळी खालावल्याने सावद्यात पाणीपुरवठा विस्कळीत; पाणी पुरवठा सुरळीत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू.

---Advertisement---

 

हतनूर धरणातून पुढील गावांसाठी पाणी सोडण्यात आल्यामुळे सावदा शहरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला असून उपसा विहिरीजवळील पाण्याची पातळी लक्षणीयरीत्या घटली आहे. परिणामी शहरातील पाणीपुरवठा काही प्रमाणात विस्कळीत झाला आहे.

या पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा सौ. रेणुका पाटील, उपनगराध्यक्ष तथा पाणीपुरवठा सभापती श्री. फिरोजखान पठाण, मुख्याधिकारी श्री. भूषण वर्मा, नगरसेवक श्री. सचिन बर्हाटे, श्री. नकुल बेंडाळे तसेच पाणीपुरवठा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी मांगलवाडी येथील जॅकवेल परिसरात प्रत्यक्ष पाहणी केली. यावेळी जेलवेल जवळील पाइपलाइन जवळ गाळ साचल्याचे निदर्शनास आले.

पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आवश्यक ती दुरुस्ती व स्वच्छता कामे तातडीने हाती घेण्यात आली असून कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मुख्याधिकारी श्री. भूषण वर्मा यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीच्या सूचना देत लवकरात लवकर परिस्थिती पूर्ववत करण्याचे निर्देश दिले आहेत.

पुढील २ ते ३ दिवस पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यास विलंब होण्याची शक्यता असून नागरिकांनी संयम बाळगून पाणी जपून वापरावे, असे आवाहन नगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---