---Advertisement---
कत्तल़खाना दुरुस्तीच्या नावाखाली नंदुरबार नगर पालिकेत सत्ताधारी शिवसेना पक्षाने गोवंश कत्तल़ीसाठी धर्मांध व्यक्तींना परवानगी दिली असल्याचा गंभीर आरोप भाजपचे उत्त़र महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी यांनी करीत ठराव पारीत करण्याच्या प्रकाराला भाजपा तीव्र शब्दात निषेध व्यक्त़ करीत आहे., असेही पत्रकात म्हटले आहे.
नंदुरबार नगर पालिकेने कत्त़लखाना दुरुस्ती करण्याचा ठराव पारीत केला आहे. या संदर्भात सकल हिंदू धर्मियांत तीव्र प्रतिक्रीया उमटतांना दिसत आहेत. या बाबतीत आमदार चंद्रकांत रघूवंशी यांनी लंगडी बाजू जनतेसमोर मांडत मोदीजींनी म्हैस कापण्याला परवानगी दिल्याचे सांगत आपल्या पापावर पांघरुन घालण्याचा प्रयत्ऩ केला आहे. वास्तविक मोदींवर टीका करणे म्हणजे सुर्यावर थुंकण्याचा प्रकार आहे. यावर भाजपाचे उत्त़र महाराष्ट्राचे संयोजक विजय चौधरी यांनी तीव्र प्रतिक्रीया दिली असून मुस्लीमांचे लांगूनचालन करण्याकरीता तसेच मुसलमानांना खुश करण्याकरीता नगर पालिका निवडणूकीत मुस्लीम मौला मौलवींना दिलेला शब्द़ या ठरावाच्या माध्यमातून पुर्ण करीत आहेत. जणू सहकारी नगरसेवक मुसलमानांच्या मतांवरच निवडून आल्याच्या अविर्भावात मुस्लीमांना खुश करण्यासाठी म्हैस कत्तल़ या शब्दांचा आडोसा घेत एक प्रकारे कत्तलखाना दुरुस्ती करुन गोवंश कत्तलाची परवानगी दिली आहे. ही बाब अंत्यंत संतापजनक आहे. स्वार्थासाठी शिवसेनेत आलेले मात्र हिंदूह़दयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार कधीही आत्मसात न केलेल्या व स्वार्थी वृत्तीचा चंद्रकांत रघूवंशी यांच्याकडून तरी हिदुत्वाची अपेक्षा तरी का करावी,अशी उपरोधीक टीकाही विजय चौधरी यांनी केली आहे. आम्ही नगर पालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की, कत्तलखाना दुरुस्तीचा ठराव तात्काळ रद़द करावा. अन्यथा जनता रस्तयावर उतरल्याशिवाय राहणार नाही.
खरं तर नगरसेवक देवेंद्र जैन हे जैन धर्मिय आहेत. त्यांनी प्रत्यक्ष या सभेला हजेरी लावून ठरावाला विरोध करणे अपेक्षित होते. कारण या समाजात अहिंसेला परमोच्च़ स्थान आहे. त्यांची सभेला गैरहजेरी म्हण़जे ठरावाला मुक संमतीच नाही का, असा सवालही विजय चौधरी यांनी केला आहे. तर नंदुरबार शहरात ठिकठिकाणी उघडयावर मांस विक्री होत आहे. ती देखील बेकायदेशीर होत आहे. याबाबत नगरपालिका प्रशासन काय करणार आहे, असाही सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नगर पालिकेतील नादान सत्ताधाऱ्यांनी हिंदूबांधवांच्या भावनांशी खेळू नये. गोमातेची कत्तल करणाऱ्यांना परवानगी देण्यात येवू नये अन्यथा भयंकर परिणाम भोगावे लागतील, असा गर्भगळीत इशाराही विजय चौधरी यांनी दिला आहे.









