---Advertisement---
भारतातील शेती व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत शेतकऱ्यांचे भविष्य अधिक उज्ज्वल करण्यासाठी डीसीएम श्रीराम लिमिटेडच्या श्रीराम फार्म सोल्युशन्सने एक मोठे पाऊल उचलले आहे. विदर्भ विभागीय कार्यक्रम नागपूर येथे नुकताच पार पडला, यावेळी कंपनीने आपली अत्याधुनिक पीक संरक्षण, विशेष वनस्पती पोषण आणि संशोधनाधारित बियाणे उत्पादने बाजारात सादर केली. विदर्भातील प्रमुख चॅनेल भागीदार आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडलेला हा सोहळा महाराष्ट्रातील कृषी क्षेत्रासाठी एक नवी पहाट ठरणार आहे.
या क्रांतिकारी उपक्रमाबद्दल बोलताना श्रीराम फार्म सोल्युशन्सचे कार्यकारी संचालक व व्यवसाय प्रमुख संजय छाब्रा म्हणाले, “श्रीराम फार्म सोल्युशन्समध्ये नवोन्मेष आमचे ध्येय नाही, आम्ही सेवा देत असलेल्या प्रत्येक शेतकऱ्याला दिलेले आमचे वचन आहे. या नव्या उत्पादनांचे लोकार्पण आधुनिक शेतीच्या क्षमतांना नव्याने परिभाषित करण्याच्या आमच्या प्रवासातील एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अत्याधुनिक बियाणे, पीक संरक्षण आणि पीक पोषण उपाय थेट शेतकऱ्यांच्या हातात देऊन आम्ही त्यांना केवळ अधिक चांगली पिके घेण्यासाठी नव्हे, तर अधिक उज्ज्वल भविष्य घडविण्यासाठी सक्षम करत आहोत.” हा उपक्रम ग्रामीण भागातील शेतीचे चित्र बदलून शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणेल, असा विश्वास व्यक्त होत आहे.
बदलता हवामान आणि वाढत्या किडींमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी कंपनीने जागतिक दर्जाचे पेटंटप्राप्त तंत्रज्ञान आणले आहे. यामध्ये ‘श्रीराम सेनकुशा’ हे जपानी तंत्रज्ञानावर आधारित कीटकनाशक सादर करण्यात आले आहे, जे फवारणीनंतर अवघ्या ३० मिनिटांत पावसाचा परिणाम सहन करू शकते. फलोत्पादनातील महत्त्वाच्या रोगांवर मात करण्यासाठी ‘श्रीराम झारविन’ हे भारतातील पहिले पेटंटप्राप्त बुरशीनाशक आणले गेले आहे, तर मका उत्पादक शेतकऱ्यांसाठी ‘श्रीराम एडेलॉन’ हे प्रभावी तणनाशक वरदान ठरणार आहे. याशिवाय, जमिनीचे ३६० अंश आरोग्य सुधारण्यासाठी आणि उत्पादनाचा दर्जा टिकवण्यासाठी ‘श्रीराम फर्मप्लस’ आणि ‘श्रीराम सिम्बिओ’ ही जैविक पोषण उत्पादने लाँच करण्यात आली आहेत. तसेच, तूर उत्पादकांसाठी कमी आणि जास्त कालावधीचे दोन विशेष संशोधनाधारित वाण उपलब्ध करून देण्यात आले आहेत.









