---Advertisement---
मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा तणावपूर्ण बनली. अमेरिका आणि इराण यांच्यात सुरू असलेल्या युद्धविराम चर्चेदरम्यान इस्त्रायलने लेबनॉनच्या काही महत्वाच्या भागांवर हल्ले केल्याची महत्वाची माहिती समोर आली आहे. या जागतिक स्तरावर घडत असलेल्या घडामोडींमुळे प्रादेशिक स्थैर्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून अमेरिका-इराण संबंधांवरही त्याचा मोठा परिणाम होऊ शकतो, अशी जागतिक स्तरावर चर्चा सुरू आहे.
जागतिक स्तरावरून मिळालेल्या माहितीनुसार, लेबनॉनची राजधानी बेरूतच्या दक्षिणेकडील भागात इस्त्रायली सैन्याकडून कारवाई करण्यात आली. इस्त्रायलने या कारवाईचे लक्ष्य हिजबुल्लाहशी संबंधित असलेल्या काही महत्वाच्या ठिकाणे असल्याचे सांगितले आहे. दरम्यान, यापूर्वी इस्त्रायलन आणि लेबनॉन यांच्यात झालेल्या युद्धविरामाच्या भविष्यबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
या पार्श्वभूमीवर अमेरिका आणि इराण यांच्यातील युद्धविरामाबाबत होणाऱ्या संवाद प्रक्रियेवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मध्यपूर्वेतील वाढत्या तणावामुळे जागतिक ऊर्जा बाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावरही लक्ष ठेवले जात आहे.









