जळगाव विधान परिषद निवडणुकीत मोठी घडामोड; बंडखोर रेश्मा काळे यांनी घेतली एकनाथ शिंदे यांची भेट, माघार घेण्याच्या सूचना…

---Advertisement---

 

जळगाव स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत मोठी राजकीय घडामोड समोर आली आहे. दिवसभर संपर्काबाहेर असल्याची चर्चा असलेल्या शिवसेना शिंदे गटाच्या बंडखोर उमेदवार रेश्मा काळे यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या भेटीवेळी रेश्मा काळे यांच्यासोबत त्यांचे पती कुंदन काळे तसेच शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख सरिता माळी उपस्थित होत्या.

या बैठकीत विधान परिषद निवडणुकीतून माघार घेऊन महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.गेल्या काही दिवसांपासून जळगावातील महायुतीमधील बंडखोरीचा प्रश्न चर्चेत असून, रेश्मा काळे यांच्या उमेदवारीमुळे राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. अशातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

दरम्यान, या भेटीनंतर रेश्मा काळे या निवडणुकीतून अधिकृतपणे माघार घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.आता रेश्मा काळे यांची पुढील भूमिका काय असेल आणि महायुतीच्या उमेदवाराला त्यांचा पाठिंबा मिळणार का, याकडे जळगाव जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---