---Advertisement---

दुर्दैवी ! क्रिकेट सामना पाहून घरी परतणाऱ्या खेळाडूंवर काळाचा घाला, दोघांचा मृत्यु, ११ जखमी, जळगाव जिल्ह्यात शोककळा

---Advertisement---

जळगाव : पुणे येथे क्रिकेटचा सामना पाहून घरी परतणाऱ्या खेळाडूंच्या वाहनाला झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू तर ११ जण किरकोळ जखमी झाले. ही घटना सोमवारी (९ जून) रोजी अहिल्यानगर-संभाजीनगर महामार्गावर घडली. या अपघातातील मृत खेळाडू हे बोदवड तालुक्यातील केसरी स्पोर्ट ॲकॅडमीचे होते. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

पुण्यातील गहुंजे येथे एमपीएल क्रिकेट सामना सुरु आहे. हा सामना पाहण्यासाठी बोदवड येथील केसरी स्पोर्ट अकॅडमीचे १३ खेळाडू गेले होते. सामना आटोपल्यानंतर हे खेळाडू क्रुझर (क्रमांक एमएच २० डीजे ४८३४) ने घराकडे परतत होते. सोमवारी पहाटे ५ वाजून १५ मिनिटांनी उस्थळ दुमाला गावाच्या हद्दीत मागून भरधाव येणाऱ्या ट्रकने त्यांच्या क्रूझरला जबर धडक दिली.

या अपघातात प्रथमेश योगेश तेली (वय १४, रा. जामखी दरवाजा, बोदवड) हा जागीच ठार , वृषभ बबन सोनवणे (वय १६, रा. बोदवड) याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर जखमी झालेले ११ खेळाडू नेवासा फाटा येथील रुग्णालयात उपचार घेत असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

घटनास्थळी पोलीस दाखल

अपघाताची माहिती मिळताच नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी धाव घेतली. तात्काळ मदतकार्य करीत जखमींना रुग्णालयात दाखल केले. दरम्यान, अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस पुढील तपास करीत आहेत.

बोदवड तालुक्यात शोककळा

या अपघाताची माहिती मिळताच बोदवड येथील नगरसेवक भरत आप्पा पाटील यांनी नेवासा पोलीस स्टेशनला संपर्क केला. त्यानंतर मृत्य मुलाच्या आई – वडिलांना या अपघाताची माहिती दिली. त्यानंतर संबंधित मुलांचे नातेवाई अहिल्यादेवी नगराकडे रवाना झाले असून या घटनेमुळे बोदवड तालुक्यात हाळहळ व्यक्त केले जात आहे. या घटनेबाबत नेवासा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment