पालकांनो सावधान! पुणे महापालिकेकडून १२ अनधिकृत शाळांची यादी जाहीर….!

---Advertisement---

 

पुण्यातील पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. पुणे महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शहरातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर करत पालकांना सावध राहण्याचे आवाहन केले आहे. शासनमान्यता नसलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास त्यांच्या शिक्षणाचे नुकसान होऊ शकते, असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे.

महापालिकेच्या माहितीनुसार, सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी काही शाळा आवश्यक शासनमान्यता नसतानाही सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे पालकांनी प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची अधिकृत मान्यता तपासूनच निर्णय घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महापालिकेने जाहीर केलेल्या यादीमध्ये बिबवेवाडी, येरवडा, कोंढवा, हडपसर, लोहगाव, उंड्री आणि आंबेगाव परिसरातील अनेक शाळांचा समावेश आहे.

न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मिडीयम स्कूल – चिंतामणी नगर, बिबवेवाडी
महात्मा गांधी प्रशाला – संजय पार्क, येरवडा
टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मक्तब – NIBM रोड, कोंढवा
सेंट व्ह्यू इंटरनॅशनल स्कूल – कोंढवा बु.
इमॅन्युअल पब्लिक स्कूल – महमंदवाडी रोड, हडपसर
आकांक्षा अॅकॅडमी स्कूल – लोहगाव
एलोरा मेडिकल अँड एज्युकेशन फाउंडेशन आर्यन पब्लिक स्कूल – नांदे, पुणे
लेगसी हाय स्कूल – अश्रफ नगर, कोंढवा
शिबली नोमानी इंग्लिश मिडीयम School – अश्रफ नगर, कोंढवा
ऑर्चिड द इंटरनॅशनल स्कूल – उंड्री
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल – कौसरबाग, कोंढवा
ग्लोबल इंग्लिश मिडीयम स्कूल – आंबेगाव बु., पुणे
आर्यन वर्ल्ड स्कूल – उंड्री, पुणे

महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, अनधिकृत शाळांमध्ये शिक्षण घेतल्यास विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नोंदी, परीक्षा प्रक्रिया आणि पुढील प्रवेशांवर गंभीर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कोणत्याही आकर्षक जाहिराती किंवा सुविधांना बळी न पडता पालकांनी शाळेची शासनमान्यता तपासणे आवश्यक आहे. या निर्णयामुळे अनेक पालकांमध्ये चिंता निर्माण झाली असून, प्रशासनाने संबंधित शाळांविरोधात पुढील कारवाईचे संकेत दिले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---