चाकवे परिसरात अज्ञात चोरट्यांनी सहा जनावर चोरून नेले, अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…!

---Advertisement---

 

जळगावच्या अमळनेर तालुक्यातल्या चाकवे शिवार परिसरात चोरीची घटना घडली असून यात अज्ञात चोरट्यांनी शेतातल्या सहा जनावरांची चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमळनेर तालुक्यातील सडावण येथील शेतकरी प्रताप श्रीकृष्ण पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, 5 मे रोजी रात्री 11 ते 6 मे रोजी सकाळी 6 वाजेच्या दरम्यान त्यांच्या अमळनेर तालुक्यातल्या चाकवे शिवारातील शेतात शेडमध्ये बांधलेल्या व संदीप पाटील यांच्या शेतात खुले असलेल्या जनावरांना अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले.

यात विविध रंगांच्या गाई व बैलांचा समावेश असून 40 हजार रुपये किमतीच्या गोधनाची चोरी झाल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. याप्रकरणी अमळनेर पोलीस ठाण्यात असण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून याविषयीचा तपास हा पोलिसांकडून सुरू आहे. मात्र या घटनेने शेतकरी चिंतेत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---