दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात भारतासोबत, पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीला इस्रायलच्या राजदूतांची टिप्पणी

---Advertisement---

 

नवी दिल्ली : पहलगाम हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त भारतातील इस्रायलच्या राजदूतानी बळी गेलेल्या २६ लोकांना श्रद्धांजली वाहिली आणि दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात इस्रायल भारतासोबत ठाम उभा असल्याचे त्यांनी सांगितले.

इस्रायलचे राजदूत रुवेन अझार म्हणाले, दहशतवादाविरुद्धच्या लढ्यात आम्ही भारतासोबत सदैव उभे आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुःखद घटनेला एक वर्ष पूर्ण झाले, ज्यात २६ निष्पाप लोकांचा बळी गेला. इस्रायलनेही पहलगामसारख्या हल्ल्याचा सामना
होता. केला आहे. पहलगामचा हल्ला ७ऑक्टोबर रोजी इस्रायलवर झालेल्या क्रूर हल्ल्यासारखाच दहशतवादाला देशाची सीमा नसते आणि या धोक्याचा सामना करण्यासाठी भारत आणि इस्रायल एकजूट आहेत.

क्रूर घटनेचा जगाकडून निषेध

  • भारतावरील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या दुःखद घटनेला एक वर्ष पूर्ण झाले आहे. अर्जेंटिनाचे सरकार आणि लोकांच्या वतीने, आम्ही पहलगाम हल्ल्यात प्राण गमावलेल्या लोकांना श्रद्धांजली अर्पण करतो. आम्ही भारताच्या पाठीशी उभे आहोत आणि दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा निषेध करतो.
    मारियानो कौसिनो, राजदूत, अर्जेंटिना

यूके देखील भारताच्या पाठीशी उभा आहे

  • ब्रिटन दहशतवादाच्या सर्व प्रकारांचा तीव्र निषेध करतो. शांतता आणि सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदारांसोबत मिळून काम करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहेत.
    लिंडी कॅमरॉन, राजदूत, ब्रिटन
  • वर्षभरापूर्वी पहलगाम हल्ल्यात मारल्या गेलेल्या निष्पाप नागरिकांना आम्ही श्रद्धांजली अर्पण करतो. दहशतवादाच्या लढ्यात आम्ही भारतासोबत एकजुटीने उभे आहेत.
    उर्सुला व्हॉन डेर लियन, अध्यक्षा, युरोपियन युनियन
  • पहलगाम हल्ल्याच्या पहिल्या वर्षपूर्तीच्या प्रसंगी, हिंसक कृत्यात प्राण गमावलेल्या निष्पाप लोकांप्रती संवेदना व्यक्त करतो. क्रूर हल्ला मानवतेच्या मुळावरच घाव घालणारा होता अशा कृत्यांना कोणत्याही समाजात स्थान नाही.
    डॉ. लखू लुहाना, अध्यक्ष, वर्ल्ड सिंध काँग्रेस

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---