चाळीसगाव- टेन्ट हाऊसच्या गोदामाला भीषण आग; टेन्ट हाऊसचे साहित्य जळून खाक, लाखोंचे नुकसान…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरातल्या एका टेन्ट हाऊसच्या गोदामाला भीषण आग लागल्याची घटना घडली. अवघ्या काही वेळातच टेन्ट हाऊसच्या गोदामाला लागलेल्या आगीने रौद्ररूप धारण केल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील एका टेन्ट हाऊसच्या गोदामात अचानक आग लागली. सुरुवातीला धूर दिसल्यानंतर काही क्षणातच आगीने मोठे रौद्ररूप धारण केले. प्राथमिक माहितीनुसार शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

चाळीसगाव शहरातील सदरचे गोदाम यापूर्वी गॅस सिलेंडर साठवण्यासाठी वापरले जात होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या ठिकाणी टेन्ट हाऊसचे साहित्य ठेवले जात असल्याची माहिती समोर आली आहे. आग लागल्यानंतर गोदामात ठेवलेले टेन्टचे साहित्य, कापड व इतर वस्तूंनी पटकन पेट घेतल्यामुळे आग वेगाने पसरली. आणि काही वेळातच सर्व जाळून खाक झालं.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी मोठ्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत टेन्ट हाऊसचे मोठ्या प्रमाणात साहित्य जळून खाक झाले असून लाखोंचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. दरम्यान, आगीचे नेमके कारण काय याचा अधिक तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---