भुसावळमध्ये गॅस एजन्सी धारकांची पोलीसांसोबत बैठक; काळाबाजार रोखण्यासाठी सूचना….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यात गॅसची टंचाई भासत असून अनेक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे, याच पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील भुसावळ शहरात गॅस सिलेंडरच्या पुरवठ्याबाबत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली.

बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या वतीने शहरातील गॅस एजन्सी धारकांना बोलावून ही बैठक घेण्यात आली. या बैठकीत गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवणे आणि कोणत्याही प्रकारचा काळाबाजार होऊ नये यासाठी आवश्यक सूचना देण्यात आल्या.

---Advertisement---

 

पोलीस प्रशासनाने एजन्सी धारकांना राज्य सरकारच्या नियमांनुसारच ग्राहकांना गॅस सिलेंडरचे वितरण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच बुकिंगनंतरच प्रत्येक घरगुती ग्राहकाला नियमानुसार सिलेंडर देण्यात यावा, असेही सांगण्यात आले.

सध्या गॅस टंचाईच्या भीतीने काही ठिकाणी ग्राहकांकडून एजन्सींवर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र दिसत आहे. मात्र नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये आणि नियमानुसार बुकिंग करूनच सिलेंडर घ्यावा, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, गॅस सिलेंडरचा काळाबाजार किंवा नियमबाह्य वितरण आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---