अक्कलकुवा येथे सांडपाण्यावरून दोन गटांत हाणामारी; सहा जण जखमी; २१ जणांवर गुन्हे दाखल…!

---Advertisement---

 

शहादा तालुक्यातील अक्कलकुवा येथील मक्राणीफळी भागात घराच्या सांडपाण्याच्या जागी सिमेंटचे बांधकाम करण्याच्या कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. १५ मार्च रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी अक्कलकुवा पोलीस ठाण्यात दोन्ही गटांनी दिलेल्या परस्परविरोधी फिर्यादीवरून एकूण २१ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

फौजीयाबी सुलतानअली मक्राणी यांनी दिलेल्या तक्रारीवरून मकसूद हारुन बलोच, सुफीया रफिक बलोच, मकबुल हारुन बलोच, जुनेद रफिक बलोच, लाला उर्फ युसुफ हारुन बलोच, साजीद मकबुल बलोच, विलाल मकसूद बलोच, जाकिर रफिक बलोच, साकिर रफिक बलोच, साबीर रफिक बलोच, इमरान हारुन बलोच, उवेद हारुन बलोच आणि रशिदा मकसूद बलोच (सर्व रा. आय.टी.आय. मागे, अक्कलकुवा) या १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. आरोपींनी बेकायदेशीर मंडळी जमवून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत जिवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या मारहाणीत आसिफ मक्राणी, जयतुबाई वळवी, मोहम्मद तलहा मक्राणी व सकिना मक्राणी हे जखमी झाले आहेत.

दुसऱ्या गटाचे फिर्यादी मकसूद अहमद हारुन बलोच यांनी दिलेल्या तक्रारीवरून सुलतानअली लियाकत अली मक्राणी, शाहरुख शब्बीर मक्राणी, आसीफ शब्बीर मक्राणी, शाकीर शकिर मक्राणी, राजु रामजी वळवी, भिका जेरमुन्या वसावे, अनिता रामजी वळवी आणि सोन्या भिका वळवी (सर्व रा. अक्कलकुवा) या ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी विटा आणि लाकडी काठ्यांनी मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. यात फिर्यादीसह जुनेद मक्राणी व सुफिया मक्राणी हे जखमी झाले आहेत.

या दोन्ही प्रकरणांत अक्कलकुवा पोलिसांनी भारतीय न्याय संहिता २०२३ च्या विविध कलमान्वये गुन्हे नोंदवले आहेत. पोलीस निरीक्षक सारंग नकलकर यांच्या मार्गदर्शनाखाली असई नुरमोहम्मद पिंजारी आणि पोहेकॉ रामजी गावीत पुढील तपास करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---