4,400 कोटींचा IPO खुला होणार; ‘अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स)’चा गुंतवणूकदारांना मोठी संधी…!

---Advertisement---

 

गुंतवणूकदारांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. अमिर चंद जगदीश कुमार (एक्सपोर्ट्स) लिमिटेड कंपनीचा बहुचर्चित आयपीओ 24 मार्च 2026 पासून खुला होणार आहे. हा इश्यू 27 मार्च 2026 पर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार असून, अँकर गुंतवणूकदारांसाठी बोली प्रक्रिया 23 मार्च रोजी होणार आहे.

कंपनीने या आयपीओसाठी प्रति इक्विटी शेअर 201 ते 212 रुपयांचा किंमतपट्टा निश्चित केला आहे. प्रत्येक शेअरचे दर्शनी मूल्य 10 रुपये असून, गुंतवणूकदारांना किमान 70 शेअर्ससाठी बोली लावता येणार आहे. त्यानंतर 70 च्या पटीत गुंतवणूक वाढवता येणार आहे.
हा आयपीओ पूर्णपणे 4,400 दशलक्ष रुपयांचा फ्रेश इश्यू असून, कंपनीकडून यामधून उभारण्यात येणारा निधी प्रामुख्याने खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आणि इतर सर्वसाधारण कॉर्पोरेट उद्दिष्टांसाठी वापरण्यात येणार आहे.

सध्या कंपनीकडे 10 रुपये दर्शनी मूल्याचे 82,796,840 इक्विटी शेअर्स आहेत. आयपीओनंतर कंपनीच्या भांडवली रचनेतही बदल होणार आहे.

या इश्यूचे बुक रनिंग लीड मॅनेजर्स म्हणून एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड आणि कीनोट फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेड काम पाहत आहेत. तर, केफिन टेक्नॉलॉजीज लिमिटेड ही कंपनी या इश्यूची रजिस्ट्रार आहे.

दरम्यान, कंपनीने 12 मार्च 2026 रोजी रेड हेरिंग प्रॉस्पेक्टस रजिस्ट्रार ऑफ कंपनिजकडे दाखल केला असून, या शेअर्सना बीएसई आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंजवर सूचीबद्ध करण्याचा प्रस्ताव आहे.

एकूणच, हा आयपीओ गुंतवणूकदारांसाठी आणखी एक महत्त्वाची संधी मानली जात आहे. आता बाजारातील प्रतिसाद आणि गुंतवणूकदारांची रुची यावर या इश्यूचं यश अवलंबून असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---