धावत्या दुचाकीवर हृदयविकाराचा झटका; 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू, परिसरात हळहळ…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील यावल शहरात एक अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना घडली आहे. धावत्या दुचाकीवर असताना अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने 32 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, महेश येवले हे शेतातून काम आटोपून दुचाकीने घरी परतत होते. दरम्यान, अंकलेश्वर-बुर्‍हाणपूर राज्य मार्गावरील जुना चोपडा नाका परिसरात त्यांना अचानक तीव्र हृदयविकाराचा झटका आला. झटका इतका तीव्र होता की त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला आणि ते थेट रस्त्यावर कोसळले.

घटना पाहताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि जखमी अवस्थेत त्यांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.

या अचानक घडलेल्या घटनेमुळे येवले कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. विशेष म्हणजे, महेश येवले हे कुटुंबातील मुख्य आधारस्तंभ असल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान, या घटनेमुळे तरुण वयात वाढत असलेल्या हृदयविकाराच्या घटनांबाबत पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली जात आहे. तज्ञांकडून नियमित आरोग्य तपासणी, ताणतणाव टाळणे आणि संतुलित जीवनशैली ठेवण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---