धरणगाव हादरलं; माजी नगराध्यक्षा पुत्राचा भीषण अपघातात मृत्यू; अज्ञात वाहन चालक फरार, परिसरात शोककळा…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात बोरगावजवळ सोमवारी दुपारी झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अविनाश संजय चौधरी असे मृत तरुणाचे नाव असून ते धरणगाव पालिकेच्या माजी नगराध्यक्षा प्रतिभा चौधरी यांचे चिरंजीव होते.

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, मृत अविनाश चौधरी हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने एरंडोलकडे जात होते. दुपारी साडेबारा ते एकच्या सुमारास बोरगाव गावाजवळ समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने त्यांच्या कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कार रस्त्याच्या कडेला उलटली आणि समोरील भाग पूर्णतः चक्काचूर झाला. या भीषण अपघातात अविनाश चौधरी यांच्या छाती व डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.


या भीषण अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. दरम्यान, स्थानिक नागरिकांनी तातडीने मदत करत अविनाश चौधरी यांना जळगाव जिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच रुग्णालय परिसरात नातेवाईक, नागरिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली. चौधरी कुटुंब सामाजिक क्षेत्रात सक्रिय असल्याने या घटनेमुळे धरणगाव शहरात शोककळा पसरली आहे. तरुण वयात झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून पोलिसांकडून फरार वाहनचालकाचा शोध सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---