राज्यात पुढील दोन दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

---Advertisement---

 

मुंबई : राज्यात एकीकडे तीव्र उष्णतेचा तडाखा कायम असताना दुसरीकडे वादळी वाऱ्यांसह पावसाचे वातावरण निर्माण झाले आहे. हवामान विभागाने पुढील दोन दिवस राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवली असून काही भागांना ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, या काळात ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने वारे वाहू शकतात. विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.


सध्या देशभरात मान्सूनपूर्व हालचालींना वेग आला असून दिल्ली, उत्तर प्रदेशसह उत्तर भारतातील अनेक राज्यांत वादळी पावसाची नोंद होत आहे. महाराष्ट्रातही नागपूर, सातारा आदी जिल्ह्यांमध्ये पावसाने हजेरी लावली असून उकाड्यापासून नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.
हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण, मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस पावसाळी वातावरण राहण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र दुसरीकडे काही भागांत उष्णतेची लाटेसदृश्य स्थिती कायम असून तापमानात लक्षणीय वाढ नोंदवली जात आहे.


दरम्यान, दक्षिण बंगालच्या उपसागरात मान्सूनसाठी अनुकूल वातावरण तयार झाले असून १६ मे रोजी अंदमान-निकोबार बेटांवर मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मान्सूनचा पुढील प्रवास सुरळीत राहिल्यास महाराष्ट्रातही पाऊस वेळेआधी दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
‘यलो अलर्ट’ असलेले जिल्हे
शुक्रवारी सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, धाराशिव, लातूर आणि नांदेड जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तसेच रत्नागिरी, सातारा, पुणे आणि बीड जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---