साखरपुड्याच्या वऱ्हाडावर काळाचा घाला; आयशर टेम्पो आणि कंटेनरची जोरदार धडक होऊन भीषण अपघातात 13 ठार, 25 हून अधिक जखमी…!

---Advertisement---

 

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर धनिवारी येथे अत्यंत भीषण अपघात घडून साखरपुड्यासाठी निघालेल्या वऱ्हाडावर काळाने घाला घातला. आयशर टेम्पो आणि कंटेनर यांच्यात झालेल्या जोरदार धडकेत तब्बल 13 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 25 हून अधिक जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताबाबत मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार, बापूगाव खडकीपाडा येथील बाळाराम जयराम दांडेकर यांच्या साखरपुड्यासाठी वऱ्हाड धनिवारीकडे निघाले होते. आयशर टेम्पोमध्ये क्षमतेपेक्षा जास्त, म्हणजेच 50 हून अधिक वऱ्हाडी प्रवास करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

भरधाव वेगात असलेल्या आयशर टेम्पोची कंटेनरला जोरदार धडक बसली. धडकेनंतर दोन्ही वाहने जागीच पलटी झाली. अपघात इतका भीषण होता की काही प्रवासी वाहनाखाली अडकले होते. घटनास्थळी एकच आक्रोश पसरला होता.

स्थानिक नागरिक, पोलिस आणि बचाव पथकांनी तातडीने मदतकार्य सुरू करत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून काहींची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याची माहिती आहे.

या दुर्घटनेमुळे साखरपुड्याच्या घरात आनंदाऐवजी शोककळा पसरली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली असून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे. भरधाव वेग, वाहनातील अतिगर्दी आणि चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.

अपघातातील मृतांची नावे :

  1. सुरेश रत्ना लाखात
  2. पांडू गणपत लाखात
  3. काळू गोविंद लाखात
  4. सुनील अर्जुन दांडेकर
  5. चिमा गोविंद कुरहाडा
  6. नमिता विठ्ठल दांडेकर
  7. सारिका संतोष लाखात
  8. आयुष सिताराम लाखात
  9. सागर नामदेव शेंडे
  10. वंदना शिवराम वळवी
  11. सलोनी शिवराम वळवी
  12. अजय अहाडी
  13. रियांशी संतोष लाखात

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---