---Advertisement---
जीवनसाथी डॉट कॉम वर ओळख झालेल्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून आणि खाजगी व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत एका 32 वर्षीय महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना यावल तालुक्यात उघडकीस आली असून सर्वत्र खळबळ उडाली आहे.
यावल तालुक्यातील रहिवासी असलेल्या 32 वर्षीय महिलेची ओळख जीवनसाथी डॉट कॉम वर बुलढाणा येथील एका तरुणाशी झालेली होती. नंतर त्या तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी महिलेसोबत लैंगिक अत्याचार केला व तिला न कळत त्याने खाजगी व्हिडिओ हे शूट केले आणि नंतर ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून खंडणीची मागणी केली. बदनामीच्या भीतीपोटी महिलेने तिचे मंगळसूत्र गहाण ठेवून 74 हजार रुपयांची खंडणी ही तरुणाला दिली.
या संपूर्ण धक्कादायक प्रकाराबाबत 32 वर्षीय महिलेने फैजपूर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत नमूद केले आहे की, जीवनसाथी डॉट कॉम वर तुषार सिद्धार्थ तायडे (रा.गौतम नगर सुंदर खेड जिल्हा बुलढाणा) याच्याशी ओळख झाली. 10 जून 2025 ते 16 मे 2026 दरम्यान, आरोपीने महिलेस लग्नाचे आमिष दाखवलं आणि त्यानंतर तिला फैजपूर, भुसावळ, मुंबई, छत्रपती संभाजीनगर, फर्दापुर आणि बुलढाणा येथे घेऊन जात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला.
महिलवेर अत्याचार करत असताना त्याने नकळत व्हिडिओ रेकॉर्ड केले आणि सदर व्हिडिओ हे तुझ्या पतीला दाखवेल, सोशल मीडियावर व्हायरल करेल असं धमकावून तिच्याकडून त्याने तीन लाखांची खंडणी मागितली. मात्र एवढी खंडणी सदर महिला ही देऊ शकली नसल्याने तिने तिचे सोन्याचे मंगळसूत्र गहाण ठेवून 74 हजार रुपये खंडणी ही आरोपीला दिली. याप्रकरणी पीडित महिलेने संस्कृत पोलीस ठाण्यात तुषार तायडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी त्याला तात्काळ अटक केली आहे.









