नवे हवामान संकट? प्रशांत महासागरात ‘एल निनो’ सक्रिय, भारतातील मॉन्सूनवर परिणामाची शक्यता, पेरण्या रखडण्याची भीती…!

---Advertisement---

 

भारताच्या मॉन्सूनबाबत चिंता वाढवणारी घडामोड समोर आली आहे. प्रशांत महासागरात एल निनोची स्थिती सक्रिय होत असल्याचे हवामान तज्ज्ञांनी नमूद केले आहे. एल निनोचा परिणाम भारतातील नैऋत्य मोसमी पावसावर होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

गेली चार दिवस मान्सून रत्नागिरी जवळ हर्णे येथे येऊन थांबला आहे, मात्र मान्सूनच्या पुढील वाटचाली साठी एल निनो अडथळा निर्माण करीत आहे असा अंदाज हवामान विभागाने दर्शविला आहे. एल निनोचा परिणाम भारतातील नैऋत्य मोसमी पावसावर होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

भारतीय हवामान विभाग (IMD) आणि अर्थ सिस्टम सायन्स ऑर्गनायझेशन (ESSO) यांच्यानुसार, एल निनोमुळे भारतातील काही भागांमध्ये मान्सूनचे प्रमाण कमी होण्याचा अंदाज आहे. याचा परिणाम शेती, पेरण्या आणि जलसाठ्यांवर होऊ शकतो.

भारतातील शेती मोठ्या प्रमाणावर मॉन्सूनवर अवलंबून असल्याने पावसातील कोणताही मोठा बदल महत्त्वाचा मानला जातो. काही हवामान मॉडेल्सनुसार तापमान वाढ आणि पावसाच्या पॅटर्नमध्ये बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

हवामान विभाग बदलत्या परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून असून पुढील काही काळात मॉन्सूनच्या प्रगतीबाबत महत्त्वाचे अपडेट्स देण्यात येणार आहेत. 15 जूनपर्यंत देशातील आणखी अनेक भागांमध्ये मॉन्सून सक्रिय पोहोचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---