21 तोळे सोनं, 25 लाख रुपये देऊनही सासरच्यांची भूक संपेना, लग्नाला 15 वर्षे उलटूनही विवाहितेचा छळ सुरू, नाशिकमध्ये सुखी संसाराचा खुनी अंत…!

---Advertisement---

 

नाशिक शहरात हुंडा व पैशांच्या मागणीसाठी सासरच्यांकडून होणाऱ्या छळाला कंटाळून 40 वर्षे महिलेने आयुष्य संपवल आहे. 25 लाख रुपये देऊनही सासरच्यांकडून सुरूच असल्याने विवाहित महिलाही कंटाळली होती.

नाशिकच्या जेलरोड परिसरात दसकगाव येथे या विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या करून जीवन यात्रा संपवली आहे. आशा प्रवीण घोटेकर असे मृत महिलेचे नाव आहे. याप्रकरणी नाशिक रोड पोलिसात पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जणांना अटक करण्यात आलेली आहे याविषयीचा पुढील तपास हा नाशिक रोड पोलिसांकडून सुरू आहे.

संगमनेर तालुक्यातील कासारा दुमाला येथील आशा यांचा विवाह 2008 मध्ये नाशिकच्या जेलरोड परिसरात असलेल्या दसकगाव येथील प्रवीण साहेबराव घोटेकर यांच्या सोबत झाला. लग्न झाल्यानंतर काही कालावधी सर्व सुरळीत सुरू होतं मात्र 2018 पासून आशा घोटेकर यांना सासरच्या लोकांनी पैशांसाठी छळायला सुरुवात केली. सासरचे मंडळ ही वारंवार पैशांची मागणी करायचे. मागणी करून त्यांनी पीडित विवाहितेला मानसिक आणि शारीरिक त्रास द्यायला देखील सुरुवात केली.

2018 मध्ये फ्लॅट व गाडी खरेदी करायची आहे म्हणून बाहेरून 25 लाख रुपये आण असं सासरच्यांनी विवाहितेच्या मागे दगादा लावला. सदर विवाहितेने तिच्या भावाकडे हे सर्व सांगितलं आणि बहिणीचा सुखाचा संसार व्हावा म्हणून भावाने त्याच्या आईच्या नावावर असलेली जमीन विकून सासरच्यांना रक्कम दिली. मात्र एवढ्यावर ते थांबले नाही. आशा यांच्याकडे असलेले 21 तोळे सोने देखील सासरच्यांनी हिसकावले.

तर दुसरीकडे मृत विवाहित महिलेला तिच्या पतीचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याबाबत विवाहितेने पतीला जाब विचारला असता, त्याने शारीरिक व मानसिक त्रास द्यायला सुरुवात केली. इतकच नाही तर सासरच्या मंडळींनी विवाहितेला घराबाहेर हाकलून देण्याचे ही धमकी दिली. जादूटोणा करून तुला मारून टाकू, अशी जीवे मारण्याची धमकी देऊन त्यांना भीती घातली. असा खळबळ जनक आरोप हा पोलिसात दिलेला तक्रारी नमूद आहे.

दरम्यान बुधवार दिनांक 6 मे रोजी सकाळी सात वाजेच्या सुमारास विवाहित महिलेने तिच्या खोलीचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे सासरच्यांनी या प्रकाराची माहिती विवाहितेच्या माहेरी दिली. माहेरच्यांनी सासरी धाव घेतली मात्र विवाहितेला मिटकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं व डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं. माझ्या बहिणीला आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाऊ गणेश वाळके यांनी केला आहे.

मृत महिलेच्या भावाने दिलेल्या फिर्यादीनुसार नाशिक रोड पोलिसात सासरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला वयात पतीसह दोन जणांना पोलिसांनी अटक केली असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---