मुक्ताईनगर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा….!

---Advertisement---

 

मुक्ताईनगर तालुक्यात अल्पवयीन मुलीचा विवाह लावून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला असून परिसरात खळबळ उडाली आहे.

वडगाव परिसरातील एका मंदिरात ३ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे तीन वाजेच्या सुमारास हा विवाह पार पडला. विवाह झालेल्या मुलीचे वय अवघे १६ वर्षे ११ महिने असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकरणी सुरपाबाई बाबुराव जामुनकर यांनी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार मुलीचे वडील रामचंद्र बाबुराव जामुनकर, आई बबिता रामचंद्र जामुनकर तसेच इतर संबंधितांनी संगनमत करून अल्पवयीन मुलीचा विवाह लावल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तपासादरम्यान झुंबरलाल हिरा धांडेकर, गजानन रमेश मांजरे आणि तुकाराम ऊर्फ मयूर पाटील यांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी सर्व आरोपींविरोधात बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत कलम ९, १० आणि ११ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

अल्पवयीन मुलींचे विवाह रोखण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने जनजागृती केली जात असतानाही अशा घटना समोर येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जयेश पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---