पिंपळगाव बुद्रुक आणि अटलगाव भूसंपादन घोटाळा प्रकरण; ६३ कोटींच्या बोगस प्रस्तावाप्रकरणी २ वकिलांसह १७ जणांवर गुन्हे दाखल….!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक आणि अटलगाव येथे भूसंपादन प्रकरणात तब्बल ६३ कोटी रुपयांच्या बोगस प्रस्तावाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी दोन वकिलांसह एकूण १७ जणांविरोधात स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

तापी पाटबंधारे विकास महामंडळ यांच्या माध्यमातून २०१२ मध्ये पाचोरा तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक आणि अटलगाव या गावांतील ७२ गटांमधील सुमारे ६८ हेक्टर जमिनीचे लघु पाटबंधारे प्रकल्पासाठी भूसंपादन करण्यात आले होते. त्या वेळी संबंधित जमीनधारकांना सुमारे ११ कोटी रुपयांचा मोबदला देण्यात आला होता.

दरम्यान, त्यानंतर वाढीव मोबदला मिळवण्यासाठी बनावट कागदपत्रे, खोट्या सह्या आणि बनावट शिक्क्यांचा वापर करून न्यायालयात तब्बल ६३ कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आल्याचा आरोप समोर आला आहे. या प्रकरणात महसूल विभाग आणि न्यायालयाची फसवणूक करण्याचा प्रयत्न झाल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती समोर आली आहे.

२०१७ मध्ये आठ जणांनी तर २०२५ मध्ये आणखी नऊ जणांनी वाढीव मोबदल्यासाठी अर्ज सादर केले होते. या सर्व प्रस्तावांमध्ये बनावट कागदपत्रांचा वापर झाल्याचे उघड झाल्यानंतर विशेष भूसंपादन अधिकारी जयश्री माळी यांनी तक्रार दाखल केली.

या तक्रारीनंतर जिल्हा पेठ पोलीस स्टेशन येथे ॲड. किशोर पाटील, ॲड. प्रशांत बाविस्कर यांच्यासह एकूण १७ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---