चाळीसगावजवळ भीषण अपघात : दहिवद फाट्याजवळ दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू, आई-वडील गंभीर जखमी…

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील दहिवद फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हिरापूर गावासह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा पसरली आहे.

अपघाताबाबत मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव तालुक्यातील हिरापूर येथील रहिवासी राकेश शिंदे हे आपल्या कुटुंबीयांसह मालेगाव येथे नातेवाईकांच्या कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम आटोपून ते छोटा हत्ती वाहनाने परतत असताना दहिवद फाट्याजवळ त्यांच्या वाहनाला समोरून येणाऱ्या पिकअप वाहनाने जोरदार धडक दिली.

या भीषण अपघातात जयश्री राकेश शिंदे (वय 19) हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर राकेश शिंदे, त्यांची पत्नी, दुसरी मुलगी नंदिनी शिंदे (वय 16) तसेच अन्य दोन जण गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मात्र उपचार सुरू असताना नंदिनी शिंदे हिचीही प्रकृती खालावल्याने तिचा मृत्यू झाला. त्यामुळे एकाच कुटुंबातील दोन सख्या बहिणींचा मृत्यू झाल्याने शिंदे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

या दुर्घटनेनंतर हिरापूर गावात शोकमय वातावरण निर्माण झाले असून नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. अपघाताची पुढील चौकशी संबंधित पोलीस करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---