नशिराबाद-भुसावळ रस्त्यावर महसूल विभागाची धडक कारवाई; तीन डंपर जप्त…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातल्या नशिराबाद ते भुसावळ रोडवर असलेल्या टोलनाका परिसरात अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांवर महसूल प्रशासनाने धडक कारवाई केली आहे या कारवाईत एकूण तीन डंपर अवैधरित्या वाळू वाहतूक करताना रंगेहात पकडले आहेत. जळगाव उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. पकडण्यात आलेले हे तीनही डंपर पुढील कारवाईसाठी नशिराबाद पोलीस स्टेशन येथे जमा करण्यात आले आहे.

अवैधरित्या वाळू वाहतूकिला आळा घालण्यासाठी महसूल प्रशासन ॲक्शन मोडवर आलं असून अजूनही कारवाई तीव्र करण्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

या धडक कारवाईत नशिराबादचे मंडळ अधिकारी मिलिंद देवरे, म्हसावदचे मंडळ अधिकारी अभिजीत येवले, आसोद्याचे मंडळ अधिकारी अजिंक्य आंधळे, ग्राम महसूल अधिकारी रुपेश ठाकूर, आकाश कडभाने, सदानंद मुंडे, मयूर महाले तसेच वाहन चालक मनोज गोळे यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वीरित्या पार पाडली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे मात्र धाबे दणाणले आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---