अमळनेरात गहू खरेदीत मोठा घोटाळा; वजनात तफावत आढळल्याने आर.के. फूड्स कंपनी सील…!

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यात गहू खरेदीदरम्यान शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. वजनकाट्यात मोठी तफावत आढळून आल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीने मंगरूळ येथील आर.के. फूड्स कंपनीवर कारवाई करत कंपनीला सील ठोकले आहे.

माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील सोनखेडी येथील शेतकरी दीपक पाटील यांनी आपला गहू विक्रीसाठी कंपनीकडे आणला होता. प्रत्यक्षात सुमारे ५० ते ५५ क्विंटल गहू असताना कंपनीच्या वजनकाट्यावर त्याचे वजन केवळ ४१ क्विंटल दाखवण्यात आल्याचा आरोप आहे. तसेच गंगापुरी येथील शेतकरी रवींद्र पाटील यांच्याही गव्हाचे वजन प्रत्यक्षापेक्षा कमी दाखवण्यात आल्याचे समोर आले. वजनातील ही तफावत लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडे तक्रार केली.

---Advertisement---

 

तक्रारीनंतर बाजार समितीचे सभापती, सचिव आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कंपनीच्या वजनकाट्यावर प्रत्यक्ष तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात फरक आढळून आला. तपासणीदरम्यान २०० क्विंटलचे वजन केवळ ९० क्विंटल तर १०० क्विंटलचे वजन फक्त ४० क्विंटल दाखवले जात असल्याचे उघड झाले.

या प्रकारामुळे उपस्थित शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला. या प्रकरणात शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच आतापर्यंत किती शेतकऱ्यांची फसवणूक झाली याचीही चौकशी केली जाणार असल्याचे बाजार समितीचे सभापती अशोक पाटील यांनी सांगितले.

दरम्यान, या प्रकरणी संबंधित कंपनीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---