जळगाव सुवर्णनगरी सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; जाणून घ्या आजचे भाव काय?

---Advertisement---

 

जळगावच्या सुवर्णनगरीत आज सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण पाहायला मिळाली आहे. सोन्याच्या दरात सुमारे 1 हजार 300 रुपयांची तर चांदीच्या दरात तब्बल 5 हजार रुपयांची घसरण झाली आहे. सततच्या दरवाढीला काहीसा ब्रेक लागला असून गताःकाना दिलासा मिळाला आहे.

आज जळगावमध्ये सोन्याचा दर 1 लाख 59 हजार रुपये प्रति तोळा इतका असून जीएसटीसह हा दर 1 लाख 63 हजार 770 रुपयांवर पोहोचला आहे. तर चांदीचा दर 2 लाख 65 हजार रुपये प्रति किलो असून जीएसटीसह हा दर 2 लाख 72 हजार 950 रुपये इतका आहे.

अमेरिका, इजराइल आणि इराण यांच्यातील तणावामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात क्रूड ऑइलच्या किंमतींवर परिणाम झाला आहे. त्यामुळे अनेक देशांनी सोन्यातील गुंतवणूक काढून तेल क्षेत्रात गुंतवणूक करण्यास सुरुवात केल्याने सोन्या-चांदीच्या दरावर दबाव निर्माण झाल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. क्रूड ऑइल बाजारात स्थिरता येईपर्यंत सोन्या-चांदीच्या दरात अशाच प्रकारचे चढ-उतार सुरू राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---