मोठी कारवाई; नवापुरमध्ये बनावट तूप कारखान्यावर छापा, तब्बल १.४६ कोटींचा बनावट मुद्येमाल जप्त…!

---Advertisement---

 

नवापुर एम.आय.डी.सी. परिसरात बनावट तूप तयार करुन त्याची विक्री केली जात आहे. अशी गोपनीय माहिती नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली, त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकत कारवाई करुन मोठया प्रमाणावर बनावट तूप व त्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे.

स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलीस पथकाने अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी व पंचांसह नवापुर एम.आय.डी.सी. परिसरातील एका कारखान्यावर छापा टाकला. कारवाई दरम्यान सदर ठिकाणी राकेशभाई ईश्वरभाई भरतिया, वय-४७ वर्ष, रा. सुरत गुजरात हा संशयित कारखान्यात आढळून आला. छाप्यादरम्यान सदर ठिकाणी पाम तेल, वनस्पती तूप, विविध रासायनिक पदार्थ व फ्लेवर यांचा वापर करुन गायीच्या तुपासारखा रंग व वास निर्माण करुन बनावट तूप तयार केले जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर हे बनावट तूप ORIA COW GHEE, SHUBH PREMIUM COW GHEE, LABH COW GHEE, RADHE KRISHNA COW GHEE आदि ब्रँडच्या नावाने पॅक करुन बाजारात विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे समजून आले. छाप्यामध्ये पाम तेल, बनावट तूपाने भरलेले डबे, विविध क्षमतेच्या स्टोरेज टाक्या, पॅकींग मशीन, प्रिंटींग मशीन, बॉयलर, इलेक्ट्रिक मोटर्स, गॅस सिलिंडर, रासायनिक फ्लेव्हर, Beta-Carotene तसेच इतर साहित्य असा एकुण तब्बल १,४६,५६,३७०/- रुपये किमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला आहे.

सदर कारवाईत राकेशभाई ईश्वरभाई भरतिया याने कुठल्याही प्रकारचा पामतेल व तूप बनविण्याचा परवाना नसताना बेकायदेशीररित्या भेसळयुक्त रसायन मिश्रीत मानवी आरोग्यास हानिकारक असे पामतेल व तूप तयार केले म्हणून त्याविरुध्द अन्न सुरक्षा व मानके कायदयान्वये नवापुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे. सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त एस., अप्पर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पोउपनि विकास गुंजाळ, पोहेकॉ मुकेश तावडे, मनोज नाईक, दादाभाई वाघ, विशाल नागरे, रमेश साळुंखे, सचिन वसावे, पोकॉ/अभय राजपूत, रामेश्वर चव्हाण अशांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---