यावल पूर्व वनपरिक्षेत्रात झाडांची कत्तल करून लाकडाची बेकायदेशीर वाहतूक? चौकशीची मागणी

---Advertisement---

 

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यात गंभीर प्रकार समोर आला असून यावल पूर्व वनपरिक्षेत्राच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोड सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, काही व्यक्तींकडून दिवसाढवळ्या तसेच रात्रीच्या वेळी झाडांची कत्तल करून लाकडाची बेकायदेशीर वाहतूक केली जात आहे.

या प्रकारामुळे परिसरातील वनसंपत्तीचे मोठे नुकसान होत असून पर्यावरणाला गंभीर धोका निर्माण झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. पर्यावरण संवर्धन व विकास समितीचे जळगाव जिल्हाध्यक्ष तसेच शेतकरी संघर्ष संघटना उत्तर महाराष्ट्रचे अध्यक्ष देवेंद्र सुरेखा मधुकर वराडे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे.
यासंदर्भात त्यांनी यावल पूर्वचे वनपरिक्षेत्र अधिकारी तसेच जळगाव येथील उपवनसंरक्षक (DCF) यांच्याकडे लेखी अर्ज सादर केला आहे. अवैध वृक्षतोड करणाऱ्यांवर तसेच त्यांना सहकार्य करणाऱ्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तसेच भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी वन विभागाने संबंधित भागात गस्त वाढवून प्रभावी उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून प्रशासनाकडून नेमकी काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---