---Advertisement---
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील वाकोद गावाजवळ जळगाव-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खाजगी बसने बैलगाडीला जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. या अपघातात बैलांसह शेतकरी जखमी झाले आहेत.
अपघातानंतर संतप्त ग्रामस्थांनी तात्काळ महामार्गावर उतरून रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. या मार्गावर सतत अपघात होत असल्याने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
रास्ता रोकोमुळे जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. परिणामी, मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून परीक्षेसाठी जाणारे विद्यार्थीही या कोंडीत अडकले, त्यामुळे त्यांना मोठा फटका बसला.
सध्या प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून घटनेचा पुढील तपास सुरू आहे.









