रावेर पोलिसांच्या नाकाबंदी दरम्यान दोन दुचाकी चोरटे जाळ्यात, १ लाख १४ हजारांच्या दोन दुचाकी जप्त…!

---Advertisement---

 

रावेर पोलिसांनी नाकाबंदी दरम्यान दोन मोटरसायकली चोरी प्रकरणी दोन जणांना अटक केली आली आहे. त्यांच्या कडून सुमारे १ लाख १४ हजार रुपये किमतीच्या दोन मोटरसायकली जप्त करण्यात आलेल्या आहेत.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, (ता. २३) रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास रावेर येथील लतीफ हॉल समोरून येथील नागझरी मोहल्ल्यातील अब्दुल रफीक अब्दुल कादर यांच्या मालकीची सुमारे ६५ हजार रुपये किमतीची होन्डा कंनीची सिल्वर रंगाची युनीकॉर्न मोटर सायकल क्र. एम एल १९ डी डब्ल्यू ४८९५ ही मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली होती. या चोरीबाबत रावेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी रावेर पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी नाकाबंदी लावून चौकशी करण्यास सुरुवात केली होती.

दरम्यान (ता. २३) रोजी रात्री आमिर खान अजमल खान व रोहित अशोक बिऱ्हाडे हे दोन युवक मोटार सायकलसह मिळून आले. त्यांच्याकडे कागदपत्रांविषयी चौकशी केली असता त्यांनी उडवा उडवीची उत्तरे दिली. त्यांची कसून चौकशी केली असता सदर वाहन लतीफ हॉल जवळून चोरी केल्याचे कबूल केले. त्यांच्याकडून ६४ हजार रुपये किमतीची युनिकॉन तसेच ५० हजार रुपये किमतीची एच एफ डिलक्स ही मोटर सायकल ही मिळून आल्याने दोन्ही मोटरसायकली मिळून एक लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

दरम्यान रावेर पोलिसांनी कोंम्बिंग ऑपरेशन राबवण्यात आले होते. यात चार जुगार अड्ड्यांवर छापे टाकून त्यांच्यावर जुगार ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली, तीन इसम सार्वजनिक जागी गांजाचे सेवन करीत असल्याचे आढळल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.गावठी दारू अवैध विक्री करणाऱ्या दोन जणांवर दारूबंदी कायदा अन्वये तर चोरीच्या उद्देशाने संशयितरित्या फिरणाऱ्यावर दोन जणांवर रावेर पोलिसांनी कारवाई केली आहे. सदर कारवाई फैजपूर विभाग पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल बडगुजर यांचे मार्गदर्शनाखाली, रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक डॉ. विशाल जयस्वाल, उपनिरीक्षक सुनील मोरे, तुषार पाटील, गुन्हे शोध पथकातील पोलीस नाईक कल्पेश आमोदकर प्रमोद पाटील श्रीकांत चव्हाण विशाल पाटील सुकेश तडवी, गजानन बोने, संभाजी बिजागरे, मुकेश सोनवणे, तथागत सपकाळे यांनी कारवाई केली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---