मनसेची जळगाव जिल्हा बैठक उत्साहात; संघटन बळकटीसाठी गजानन राणे यांचे ठोस निर्देश

---Advertisement---

 

जळगाव (प्रतिनिधी): महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच्या जळगाव जिल्हा संपर्क अध्यक्ष गजानन राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेली जिल्हा बैठक उत्साहपूर्ण व शिस्तबद्ध वातावरणात संपन्न झाली. या बैठकीस जिल्ह्यातील तालुका, शहर व ग्रामीण भागातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.


बैठकीत पक्ष संघटन, सभासद नोंदणी, स्थानिक प्रश्न तसेच आगामी निवडणुकांच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला. पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केलेल्या विविध मुद्द्यांवर राणे यांनी स्पष्ट व सकारात्मक भूमिका मांडत पुढील कामकाजासाठी दिशा दिली.


यावेळी त्यांनी मनसेचे संघटन तळागाळापर्यंत अधिक मजबूत करण्यावर भर देत सभासद नोंदणी मोहिम मोठ्या प्रमाणात राबवण्याचे आवाहन केले. तसेच ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी स्थानिक तयारीचे सविस्तर अहवाल तातडीने सादर करावेत, असे निर्देशही त्यांनी दिले.


ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी ग्रामसभांना नियमित उपस्थित राहून गावपातळीवरील प्रश्नांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. दरम्यान, २९ मार्च रोजी राणे भुसावळ, रावेर, यावल आणि चोपडा विधानसभा मतदारसंघांचा दौरा करून कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधणार आहेत.


बैठकीनंतर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे उपजिल्हाप्रमुख भाऊसाहेब सोनवणे यांनी विश्रामगृहात राणे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या भेटीतून स्थानिक राजकारणात सकारात्मक वातावरणाचे संकेत मिळाले.
या बैठकीमुळे जळगाव जिल्ह्यात मनसेच्या संघटनाला नवी ऊर्जा मिळाली असून, आगामी काळात पक्ष अधिक मजबूत करण्याचा निर्धार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.


उपस्थित पदाधिकारी:
जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष मुकुंदा रोटे, उपजिल्हाध्यक्ष विनोद पाठक, संजय नन्नवरे, एरंडोल तालुका अध्यक्ष विशाल सोनार, जामनेर तालुका अध्यक्ष अशोक पाटील, जळगाव शहराध्यक्ष विनोद शिंदे, किरण तळले, उपशहर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, प्रकाश जोशी, चेतन पवार, विभाग अध्यक्ष उमेश आठरे, विशाल जाधव, शाखाध्यक्ष अशोक खाटीक, खुशाल ठाकूर, राहुल चव्हाण, ऐश्वर्या श्रीरामे, साजन पाटील, दीपक राठोड, प्रकाश झोपे, जितेंद्र पाटील, संदीप मांडोळे, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, हर्षल वाणी यांच्यासह अनेक पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---