---Advertisement---
भुसावळ शहराच्या राजकारणात नवा ट्विस्ट पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) च्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांनी आपल्या नगरसेवकांसह थेट मंत्री गिरीश महाजन यांची जामनेर येथे भेट घेतल्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
विरोधी राजकीय गटातील नगराध्यक्षा थेट सत्ताधारी मंत्र्यांकडे गेल्याने भुसावळमधील राजकीय समीकरणांमध्ये बदल होणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. या भेटीत शहरातील विकासकामे, प्रलंबित योजना आणि निधीचा मुद्दा मांडण्यात आला. भुसावळसाठी विशेष निधी देण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मात्र, या भेटीमागे केवळ विकासाचा अजेंडा आहे की राजकीय समीकरणांमध्ये काही बदलाची चाहूल आहे, याबाबत शहरात विविध चर्चा रंगत आहेत.
राजकीय वर्तुळात या भेटीकडे विशेष लक्ष लागले असून, आगामी काळात याचे परिणाम स्थानिक राजकारणावर दिसून येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.









